भंडारा : नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडुंनी दैदिप्यमान कामगिरी केली. नौकायन प्रकारात दत्तू भोकनळ व त्याच्या सहकाऱ्यांनी सुवर्ण पदकापर्यंत मजल मारली. या खेळाडुंना प्रशिक्षण देण्याचे काम भंडाऱ्यांचे सुपूत्र विकल सार्वे यांनी केले. ते भंडारा येथे आले असता जिल्हा परिषद चौकात कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नाना पटोले, खा. मधुकर कुकडे, धनंजय दलाल यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. 


भंडारा जिल्ह्यातील कोरंभी या लहानशा गावातील विकल सार्वे हे २००९ मध्ये सैन्यात दाखल झाले. खेळाचा कुठलाही गंध नसताना त्यांच्यातील प्रतिभा ओळखून सेनेतील सुभेदार कुदरत अली यांनी त्यांना खेळाडू म्हणून निवडले. आणि तेव्हापासून त्यांनी स्वत:ला सिद्ध करण्यात सुरूवात केली. अनोळखी व फारसा परिचित नसलेल्या रोव्हिंग अर्थात नौकायन य क्रीडा प्रकारात राष्ट्रीय स्तरावर खेळून १७ पदके प्राप्त केली. २०१० मध्ये पहिल्यांदा या खेळात भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले होते. २०१६ साली दत्तू भोकनळ याने पहिल्यांदाच आॅलम्पिक स्पर्धेत भारताला १३ वी रँक मिळवून दिली होती. आॅलम्पिक स्पर्धेतील आजपर्यंतचे हे सर्वात मोठे यश आहे. विकल सार्वे आज आर्मी रोव्हिंग नोड कॉलेज आॅफ मिल्ट्री, पुणे येथे या खेळाचे प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. आशियाई स्पर्धेत भारताचा ठसा उमटविणाऱ्यां खेळाडुंच्या मागे भंडाऱ्यांचे विकल सार्वे यांचा हात असल्याने जिल्ह्याची मान उंचावली आहे. स्पर्धेनंतर ते स्वगावी कोरंभी येथे आले असता जिल्हा परिषद चौकात त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला. यावेळी यशवंत सोनकुसरे, सुर्यकांत इलमे, नितीन तुमाने, प्रमोद वावधने, राकेश आंबोने, जयंत बोटकुले, रुपेश आतिलकर, बबलू भूरे, शेखर गभने, राहूल डोंगरे, राहूल बारई, प्रविण बावनकर, कैलास बडवाईक, प्रणय थोटे, बंटी कावळे, विजय बडवाईक, दिपक हटवार, महेश भोंगाडे, हेमंत हटवार, मंगेश मेहर, हिमांशू सार्वे, अजय येवले, मंगेश भोंगाडे, रजत थोटे, प्रसन्न थोटे, रोशन नंदनवार, प्रशिक सुखदेवे, आकाश चोपकर, आकाश माकडे तथा राजे बॉईज ग्रुप गणेशपूरचे सदस्य उपस्थित होते.Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours