महात्मा गांधी आणि त्यांच्या मुलांचं नातं हे अतिशय नाजूक आणि वेगळं तितकच वादाचंही होतं. सततची आंदोलनं, देश-विदेशात प्रवास आणि प्रचंड असलेल्या व्यापामुळं गांधीजींना आपल्या मुलांकडे जास्त लक्ष देता आलं नाही. त्यामुळं त्यांच आणि त्यांच्या मुलांचं नातं हा कायम चर्चेचा विषय राहिला आहे.
मणिलाल आणि मुस्लिम मुलगी
गांधीजींचा दुसऱ्या क्रमांकाचा मुलगा मणिलाल याचं एका मुस्लिम मुलीवर प्रेम होतं. त्याला तिच्यासोबत लग्न करायचं होतं. पण गांधीजींनी या लग्नाला सक्त विरोध केला होता. गांधीजी हे सुरवातीच्या काळात आंतर-जातीय आणि आंतर धर्मीय लग्नाच्या विरोधात होते. 1930 नंतर त्यांचा हा विरोध मावळला होता. पण सुरूवातीच्या दिवसांमधल्या या भूमिकेमुळे मणिलालच्या आयुष्यात वादळ निर्माण झालं.
दक्षिण आफ्रिकेतले गांधीजींचे विश्वासू सहकारी युसूफ गुल यांची मुलगी फातिमा आणि मणिलाल याचं एकमेकांवर प्रेम होतं.
गुल हे आश्रमातच राहत असल्यानं लहानपणापासून ते आणि फातिमा एकमेकांना चांगले ओळखत होते आणि मित्रही होते. नंतर मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. त्या प्रेमाचं रूपांतर त्यांना लग्नात करायचं होतं. तब्बल 14 वर्ष त्यांची ही प्रेमकहाणी सुरू होती. लग्न करायचं दोघांनी ठरवल्यानंतर मणिलालने बापूंना परवानगी मागितली. मात्र त्यांनी परवानगी दिली नाही. तर आपल्याच जातीतल्या मुलीशी त्याचं लग्न लावून दिलं.
Post A Comment:
0 comments so far,add yours