मुंबई : निवडणुकांच्या तोंडावर राजकीय वाऱ्यांची दिशा बदलताना पाहायला मिळतीय. मनसेला आघाडीत घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रयत्नाचा नवा अंक आज पुन्हा समोर आला आहे.

औरंगाबादेतून निघालेल्या एकाच विमानात राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी प्रवास केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात. तर दुसरीकडे शरद पवार आणि भाजप प्रदेशाध्ययक्ष रावसाहेब दानवेंनी एकाच कार्यक्रमात हजेरी लावली. राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून विदर्भ दौऱ्यावर होते. दौरा संपवून राज ठाकरे औरंगाबादेत पोहोचले. औरंगाबाद विमानतळावरून विमानाने राज ठाकरे मुंबईला येणार होते. तेव्हा शरद पवारही याच विमानाने प्रवास करत होते.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours