रिपोर्ट सय्यद जाफरी भंडारा
प्रशासना कडून पाणी सोडण्यास टाळाटाळ
मागील एक महिन्या पासून पावसाने दडी मारल्याने भंडारा जिल्ह्यात धान उत्पादत शेतकरी अडचणीत सापडले आहेत . 
भंडारा तालुक्यात खुर्शीपर येथील शेतकरी पेंच प्रकल्पा तील पाण्याची वाट पाहत असून पेंच प्रकल्पाला पाण्याची मागणी करूनही पाणी सोडण्यात टाळाटाळ करीत आहेत.  त्यामुळे  खुर्शीपर येथील शेतकऱ्यांचा संताप मंगळवारी दिसून आला . 
या आधीही माजी आमदार नरेंद्र भोंडकर व जिल्हा परिषद सदस्य प्यारेलाल वाघमारे यांच्या नेतृत्वात आजूबाजूच्या अनेक गावातील शेतकरी एकत्र येऊन भंडारा खात रामटेक मार्ग तीन तास बंद पडला होता. व अधिकाऱ्यांच्या वाहनाला घेराव केला. त्यामुळे प्रशासनाने अनेक शेतकऱ्यांवर गुन्हा नोंद केले.
पेंच प्रकल्पाच्या चुकीच्या नियोजनामुळे व सरकारच्या उदासीन लोकप्रतिनिधीमूळे आज शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसान होत असल्याचं आरोप माजी आमदार नरेंद्र भोंडकर यांनी केले. 
आज जिल्हाधिकारी भंडारा यांचे मार्फत मा मुख्यमंत्री यांना निवेदन देन्यात आले. ज्या प्रकारे शेतकऱ्यांवर पाण्याची मागणी करत असतानाही त्यांचे वर पोलोस विभागामार्फत गुन्हा नोंद करण्यात आला तसेच संबंधित अधिकारी यांच्या चुकीच्या नियोजनामुले जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचा आर्थिक नुकसान झाले त्यामुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांचे आत्महत्या वाढू शकतात . शेतकऱ्यांवर कर्ज काढून जीवन जगण्यास ही सरकार  भाग पाडत आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी यांचेवर सुद्धा गुन्हा नोंद करा अशी मागणी करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटतोय

प्रचंड ऊन तापत असल्यामुळे  हातात येणारे पीक पाण्यामुळे जात आहे. अश्या परिस्थितीत प्रकल्पात असलेले पाणी प्रशासन सोडत नाही. त्यामुळे तालुक्यातील धन उत्पादक शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध सुटत आहे. धान वाचविण्यासाठी शेतकरी आटोकाट प्रयन्त करीत आहेत. निसर्गाने साथ सोडली असताना प्रशासन सुद्धा सुस्त आहे.

पाण्यासाठी शिवसेनेचा चक्काजामचा इसार

धोक्यात आलेला धान पीक वाचविण्यासाठी पेंचं प्रकल्पाचे पाणी सोडले नाही तर राष्ट्रीय महा मार्ग जिल्हाधिकारी कार्यालय समोर शिवसेने कडून चक्का जाम करण्यात येईल असा इशारा निवेदनातून जिल्हाधिकारी यांना देण्यात आला आहे. या शिष्टमंडळाचे नेतृत्व शिवसेनाप्रमुख व माजी आमदार नरेन्द्र भोंडकर यांनी केले.




Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours