रिपोर्टर सय्यद जाफरी
शेकडो शेतकऱ्यांसह शिवसेनेचा राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम

जिल्हाधिकारी यांनी सिंचनासाठी पाणी सोडण्याचे आस्वासन दिल्या नंतर ही शेतकऱ्यांचे समाधान न झाल्याने शिवसेनेच्या नेतृत्वात राष्ट्रीय महामार्गावरील मुजबी येथे दुपारी १२ वाजता चक्काजाम आंदोलन करण्यात आले.त्यामुळे काही काळ राष्ट्रीय महामार्ग बंद राहिला व वाहतूक ठप्प पडली. भंडारा जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी पेंच प्रकल्पाच्या क्षेत्रात येतात. भंडारा व मोहाडी तालुक्यातील शेतकऱ्यांचे धान पीक सुखत चालल्यामुळे शेतकऱ्यांना धानासाठी पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. जर पाणी मिळाले नाही तर शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होईल पण सरकार उदासीन असून शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नाला जाणीव पूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप माजी आमदार नरेंद्र भोंडकर यानी केले.त्यावेळी या आंदोलनात शिवसेनेचे संजय रेहपाडे प्रभू हटवार सुरेश धुर्वे अनिल कडवं विलास लीचडे नरेश झळके चेतन भुरे हेमंत भुरे नरेश लांजेवार राजेश सर्वे रविकांत आकरे मुकेश ठउकर नीलकंठ मानापुरे रणजित आकरे रामचंद्र बुरडे प्रशांत कुकडकर अनिल चाकोले आदींसह शेकडो शिवसैनिक व शेतकरी सहभागी झाले होते.

मित्रपक्ष्यानेच केला मित्राचा घातजिल्हाप्रमुख शिवसेना माजी आमदार नरेंद्र भोंडकर यांचा आरोप

सिंचनासाठी शेतकऱ्यांना पाण्याची आवशकता असतानाही शासनाने कसलेही पूर्व नियोजन न करता शेतकऱ्यांच्या धानपिकाला वाऱ्यावर सोडले म्हणून शिवनेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी राष्टीय महामार्गावर चक्का जाम केला.शिवसेना पक्ष सरकार मध्ये असूनही जनसामान्यांचे प्रश्न शासनापर्यन्त पोहचविण्यासाठी नेहमी तत्पर असतो पण तीन दिवसांपूर्वी खुर्शीपार येथे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी प्रकल्पातील पाणी सोडणार असल्याचे आश्वासानं जलसंपदा विभागाच्या अभियंतानी दिले होते. परंतु भंडारा तालुक्यात पाणी पोहोचलेच नाही. उलट धानपिकाला पाणी देण्याऐवजी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर व शिवसेना कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद करण्यात आले. त्या नंतर मागणी पूर्ण न झाल्यामुळे दि. ४/१०/ २०१८ ला दुपारी १२ वाजता मुजबी येथे राष्ट्रीय महामार्गावर चक्काजामआंदोलन करण्यात आले. या वेळी टायर पेटवून वाहतूक ठप्प करण्यात आली. व आंदोलन अधिक तीर्व होत असल्याचे पाहून पोलिसांनी जिल्हा प्रशासनाच्या आदेश्याने आंदोलनकर्त्यांना अटक केली. त्यावेळी आम्हाला धोक्याने अटक केली शेतकऱ्यांचे प्रश्न बाजूला ठेऊन चर्चेसाठी जात असल्याचे सांगून पोलीस स्टेशनला  आणण्यात आले असे माजी आमदार नरेंद्र भोंडकर यांनी सांगितले. 
देश्यात व राज्यात भाजप शिवसेना पक्ष्याची सत्ता असतानाही आपल्याच मित्र पक्षावर अश्या प्रकारची कार्यवाही करणे कितपत योग्य आहे असा प्रश्न आता मित्र पक्ष शिवसेनेला पडला असून जनसामान्यांचे प्रश्न प्रशासनाच्या माध्यमातून शासनापर्यन्त पोहचविणे गुन्हा आहेका या सर्व प्रक्रियेमुळे शेतकरी आजही अडचनित आहे त्यावर जिल्हा प्रशासन व शासन कधी लक्ष देईल हा एक गंभीर प्रश्न तशाच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक व मानसिक शोषण होत आहे.








Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours