औरंगाबाद : औरंगाबाद शहरात पुन्हा तलवारीचा साठा पोलिसांच्या हाती लागला आहे. विविध ठिकाणी धाडी टाकून पोलिसांनी 20 धारदार तलवारी जप्त केल्या आहेत.
एक व्यक्ती या तलवारी बाहेरून आणून शहरात मोठ्या प्रमाणात विकत होता. त्याला गुन्हे शाखेच्या ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने 20 तलवारी ज्यांना विकल्या त्यांची नावे सांगितली. त्याच्या माहितीवरून पोलिसांनी 6 जणांना ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणी औरंगाबाद गुन्हे शाखा अधिक तपास करीत आहे.
मे महिन्यातही फ्लिपकाॅर्टवरून चक्क तलवारी आणि चाकू सारखी घातक शस्त्र मागवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता.
कुरिअरच्या माध्यमातून चक्क तलवारी जंबीये आणि कुकरी मागवण्यात आल्या होत्या. पोलिसांना याचा सुगावा लागताच रिअर कंपनीवर छापा मारून कुरिअर कंपनीच्या कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं होतं.
फ्लिपकार्ट कंपनीच्या कुरिअर ने ही शस्त्र औरंगाबादेत आली होती. पोलिसांनी 12 तलवारी 13 मोठे चाकू, 8 गुप्ती आणि जंबीये याच्यासह 6 जणांना ताब्यात घेतलं होते.



Post A Comment:
0 comments so far,add yours