डोंबिवली, 09 ऑक्टोबर : डोंबिवलीत एका कंपनीला लागलेली भीषण आग अखेर विझली. एमआयडीसी फेज 1च्या झेनिथ कंपनीला ही आग लागली होती.  रबर बनविण्याच्या या कंपनीला रात्री उशीरा आग लागली होती. दरम्यान शर्थीच्या प्रयत्नानंतर ही आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय.
सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही. तर अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण ठेवण्यात यश आलं आहे.
डोंबिवलीत कंपनीला भीषण आग
तर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग मोठी असल्यामुले कंपनीचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्यामुळे परिसरात मोठी हानी टाळली गेली. कंपनी रात्री बंद असल्यामुळे यात कोणतेही कर्मचारी नव्हते.
दरम्यान, कंपनीला आग लागलीच कशी याचा आता पोलीस तपास घेत आहे. तर यासाठी पोलीस प्रत्यक्षदर्शींचीही चौकशी करणार आहे. तर या भीषण आगीतून यासंदर्भात काही सीसीचीव्ही मिळतं का याचाही पोलीस तपास करत आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours