मुंबई, 09 ऑक्टोबर : 'मी टू' चळवळीत आता अभिनेता आलोक नाथ यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आलाय. सिनेसृष्टीचे संस्कारी अभिनेते आलोक नाथ यांनी बलात्कार केल्याचा गंभीर आरोप लेखिका विनता नंदा यांनी केला आहे.
सोशल मीडियावर यासंदर्भात त्यांनी नाव न घेता 'संस्कारी' असा उल्लेख करत 'तारा' मालिकेच्या दरम्यान जे झालं ते कथित केलं. 20 वर्षांपूर्वी एका पार्टीनंतर आलोक नाथ विनता नंदाच्या घरी तिला सोडायला गेले आणि तिथे त्यांनी बलात्कार केला.
या धक्क्यातून सावरायला त्यांना खूप वेळ लागला. पण आज मुलींनी अन्यायाविरोधात आवाज उठवण्याची गरज आहे असं सांगत विनता नंदा यांनी ही धक्कादायक घटना सोशल मीडियावर शेअर केली.
तनुश्री दत्ता-नाना प्रकरण खूप गाजतंय. तनुश्रीनं तोंड उघडल्यावर अजून काही सेलिब्रिटींच्या गैरवर्तनाच्या घटना समोर यायला लागल्यात. तनुश्रीनं नाना पाटेकरांविरोधात पोलिसांमध्ये तक्रारही केली.
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने सिने दिग्दर्शक विकास बहलवर जबरदस्ती केल्याचा गंभीर आरोप केला आहे. 'क्वीन' सिनेमाच्या शूटिंगवेळी विकास बहलने मला जबरदस्ती केल्याचा आरोप कंगनाने केला आहे. त्यामुळे विकास बहल याच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे.
टाइम्स आॅफ इंडियाच्या माहितीनुसार कैलाश खेरवर एका महिला पत्रकारानं असभ्य वर्तनाचा आरोप केलाय. ही महिला कैलाश खेरच्या घरी मुलाखत द्यायला गेली होती, तेव्हा तो तिच्या मांडीवर हात ठेवत होता. ट्विट करून तिनं हे समोर आणलंय.
प्रसिद्ध लेखक चेतन भगतलाही फेसबुकवर महिलेची आणि पत्नीची माफी मागायला लागली. त्या महिलेनं व्हाॅटसअॅपवर चेतन भगतशी झालेल्या संभाषणाचा स्क्रीन शाॅट व्हायरल केला होता.



Post A Comment:
0 comments so far,add yours