पुणे, 08 ऑक्टोबर : पिंपरी चिंचवडमध्ये दुचाकीवरून जाणाऱ्या एका तरुणीचा पतंगाच्या मांज्याने गळा कापला गेल्याने जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पंतगाचा मांजा खूप बारीक आणि धारदार असतो. त्यामुळे सहज शरीराला कापलं जाऊ शकतं आणि त्यातूनच या तरुणीला आपला जीव गमवावा लागला आहे.
कृपाली निकम असं मृत्यू झालेल्या तरुणीचं नाव आहे. कृपाली पेशाने डॉक्टर होती. ती मूळची जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावची रहिवासी असलेल्या कल्याण आणि पोर्णिमा निकम ह्या दाम्पत्यांची एकुलती एक मुलगी असल्याचं सांगण्यात येत आहे.
भोसरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृपाली ही नाशिकफाटा उड्डाणपुलावर दुचाकीवरून जात होती. त्यावेळेस तिथे हवेतून मांजा धागा आला आणि कृपालीच्या गळ्याभोवती गुंडाळला गेला. या धाग्याला इतकी धार होती की त्याने कृपालीचा गळाच चिरला गेला. गळा चिरला गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्या रक्ताच्या थारोळ्यात कृपाली रस्त्यावरच पडली होती.
यावेळी तेथून जाणाऱ्या एका नागरिकाने डॉ. निकम हिला भोसरीमधील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं. मात्र कृपालीच्या गळ्या भोवती झालेली जखम इतकी गंभीर होती की उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. तिच्या या अशा अकाली जाण्याने तिच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
याआधीही पिंपरी-चिंचवड शहरात पतंगाच्या धोकादायक मांजामुळे एका चार वर्षीय चिमुकल्याचा डोळ्यांवर आणि एका जेष्ठ नागरिकांच्या गळ्यावर मोठ्या प्रमाणात ईजा झाली होती. पण आता तर या मांजामुळे एका तरुणीला आपला नाहक जिव गमवावा लागला आहे.
त्यामुळे बंदी असलेला पंतगाचा मांजा पिंपरी शहरात राज रोसपणे विकला जातोय हे पुन्हा एकदा स्पस्ट झालाय. आता तरी महापालिका प्रसासन जाग होणार का प्रश्न विचारला जातोय.
Post A Comment:
0 comments so far,add yours