मुंबई: साताऱ्यातल्या उमेदवारीबाबत उदयनराजे भोसले यांनी शरद पवार जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल असं म्हटलंय, खरं पण आज झालेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उदयनराजेंना उमेदवारी द्यायला पक्षातूनच विरोध झाल्याची चर्चा आहे. याबाबत उदयनराजे यांना विचारलं असता ते म्हणाले, "मी पवारांना सांगितलंय की, उमेदवार देण्याआधी तुम्ही प्रत्येक आमदारांसोबत वैयक्तिक चर्चा करा, त्यानंतरच तुम्हाला माझ्याविषयी मत समजेल. कोण दोन तीन लोक विरोध करतात म्हणून तिकीट नाही असे नको, जे विरोध करतात त्याची ताकद किती याचाही विचार करावा", असंही पवारांना सांगितल्याचं उदयनराजे म्हणाले. तर साताऱ्यात उदयनराजें ऐवजी रामराजे यांना तिकीट द्यावे अशी मागणी पक्षातूनच होत असल्यामुळे निवडणुकीपूर्वी उदयनराजें विरुद्ध रामराजे असा सामना रंगणार असल्यांचं दिसून येतंय.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours