● घटना अड्याळ बसस्थानकावरील ●
   अड्याळ -पोलीस स्टेशन अड्याळ ठाण्यातील  वाहतुक पोलीस व सहाय्यक होमगार्ड सैनिकाला एका पत्रकाराने वाद घालून तुझी बातमी प्रकाशीत न करण्यासाठी पाच हजाराची लाच मागीतल्याची घटना आज दि.१६ आँक्टोबर ला सकाळी १० वाजता अड्याळ बसस्थानक परीसरात घडली सदर तक्रार पोलिस स्टेशन अड्याळला केली आहे.
     सविस्तर वृत्त असे कि,पवनी तालूक्यातील अड्याळ पोलीस स्टेशन येथे वाहतूक पोलीस एस.आर.सोरते व सहाय्यक वाहतुक होमगार्ड गिरीष मोटघरे हे अड्याळ बसस्थानक परिसरात फिक्स पांईट कर्तव्यावर असतांना लोकमतचे वार्ताहर विशाल रणदिवे यांनी आपली स्कूटी रोडवर उभी केली त्यावेळी गिरीष मोटघरे यांनी स्कूटी बाजूला करा असे म्हटले त्यावेळी रणदिवे यांनी तु माझी गाडि बाजुला करणारा कोण ? असे म्हणून तोंडा तोंडि शाब्दिक बाचाबाची केली. वाद शिंगेला जात आहे म्हणून सोरते यांनी होमगार्ड मोटघरे यांना थोळ्या वेळासाठी घरी जाण्यास सांगीतले.या दरम्यान गिरीष मोटघरे घरी असतांनी सकाळी १० वाजता दरम्यान रणदिवे यांनी तुम्ही कुणा काठी मारली काय ? अशी तुमची माझ्याकडे तक्रार आहे ती बातमी प्रकाशीत करावयाची नसेल तर तु मल्हा पाच हजार रुपयेदे अशी मागणी केल्याची तक्रार पोलीस स्टेशन अड्याळला मोटघरे यांनी केली.
    वार्ताहर रणदिवे यांनी सुध्दा पोलीस स्टेशन अड्याळला होमगार्ड मोटघरे यांचे विरूध्द तक्रार केली आहे तपास पोलीस निरिक्षक सुरेश ढोबळे करीत आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours