10 आॅक्टोबर : पालघर जिल्ह्यातील चिखले समुद्रकिनारी चार संशयीत शिरल्याची शक्यता वर्तवली जात आहे. एका स्थानिक व्यक्तीने चार संशयास्पद शस्त्रधारी इसम पाहिल्याचे पोलिसांना कळविल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्याआधारे एका व्यक्तीचा स्केज जारी करण्यात आलाय.
पालघर जिल्ह्यातील चिखले समुद्रकिनारी एका स्थानिक व्यक्तीने चार संशयीत व्यक्ती घुसल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केलंय. मात्र या घटनेची माहिती पसरताच चिखले, बोर्डी, घोलवड, डहाणू परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन करून काही निष्पन्न झाले नाही.
मात्र हे संशयित इसम नेमके होते कोण ? त्यांचा उद्देश काय ? ह्या संशयितांना पहिल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीच्या म्हणण्यात किती तथ्य आहे याचा शोध लावणे हे पोलिसांपुढे मोठे आव्हान ठरले आहे.
ज्या प्रत्यक्षदर्शीने चार संशयितांना पहिल्याचा दावा केला होता. त्या माहितीच्या आधारे केलेल्या वर्णनावरून घोलवड पोलिसांनी त्या चार संशयित इसमापैकी एकाचे स्केच जारी केले असून अश्या वर्णनाची व्यक्ती आढळल्यास पोलिसांशी संपर्क करावा असं आवाहन केलंय.
उरणमध्येही घडली होती अशी घटना
२३ नोव्हेंबर २०१६ ला अशीच घटना उरण येथे घडली होती. उरण येथे चार संशयीत दिसल्याच्या बातमी संपूर्ण देश ढवळून निघाला होता. नेमके हे चार संशयीत गेले कुठे याचे उत्तर मात्र अजूनही तपास यंत्रणेंना मिळाले नाहीये.
उरण हे शहर मुंबईपासून अवघ्या ४० मिनिटांच्या अंतरावर आहे. रस्ता आणि सागरी मार्गे या शहराकडे वाहतूक केली जाते. पण जे एनपीटी, नेव्ही बेस यामुळे या शहराची झपाट्याने वाढ झाली. सागरी मार्गे या शहराची प्रमुख वाहतूक असल्याने या भागात विविध जाती धर्माच्या देशोदेशीच्या लोकांचा वावर वाढू लागला. तसं आपल्याच दुनियेत मश्गुल असलेले हे शहर २२ सप्टेंबर रोजी अचानक देशातील चर्चेचा केंद्रस्थान बनले होते.
चार संशयीत उरण मध्ये दिसले, त्यांच्याकडे हत्यारं होती. त्यांनी मास्क घातले होते. अशा प्रकारची माहिती उरण पोलिसांना काही विद्यार्थ्यांनी दिली आणि एकच खळबळ उडाली. जोरात शोध कार्य सुरू झाले, एनएसजी फोर्स वन, सैन्य, सागरी पोलीस, नेव्ही आणि स्थानिक पोलिसांचे मोठे कोंबिंग आॅपरेशन हाती घेतले होते. पण अथक शोधकार्यानंतर या चार संशयितांचा शोध लागला नव्हता.
Post A Comment:
0 comments so far,add yours