रत्नागिरी : गाडी मागे घेत असताना बाळाला घेऊन उभ्या असलेल्या आईला धक्का लागला. त्यामुळे खाली पडलेल्या बाळाचा गाडीच्या चाकाखाली येऊन दुर्दैवी मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना दापोलीमध्ये घडली.

ही घटना आज संध्याकाळच्या सुमारास घडली. बारामती येथील बनसोडे नावाची महिला आपल्या ८ महिन्याच्या अवनी बनसोडे या मुलीला घेऊन दापोली तालुक्यातील मुरुड समुद्र किनाऱ्यावर फिरण्यासाठी आली होती. त्यावेळी समुद्रकिनाऱ्यावर नकाते नावाचा व्यक्ती हा आपली स्कॉर्पिओ गाडी मागे घेत होता. मागे कुणी आहे याचही भान नसताना त्याने बेदकारपणे चालवली

तिथे उभ्या असलेल्या महिलेला गाडीचा धक्का लागला त्यामुळे ८ महिन्याचे बाळ खाली पडले. तर आई बाजूला फेकली गेली. गाडी तशीच मागे येत असताना बाळ चाकाखाली सापडले गेले. महिलेनं आरडाओरडा केल्यानंतर गाडीचालकाला स्थानिकांनी पकडलं.

बाळाला जखमी अवस्थेत स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डाॅक्टरांनी बाळाला मृत घोषित केलं. 

बाळाच्या मृत्यूमुळे स्थानिकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. परंतु, गर्दीचा फायदा घेत गाडी तिथेच सोडून गाडीचालक पसारा झाला. मृत बाळाच्या आईच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. गाडीचालक नकाते हा भंडारा येथील रहिवासी असल्याचं कळतंय. पोलीस अधिक तपास करत आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours