पंढरपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाजी भिंडेंना क्लीन चिट देणे चुकीचे होते. मुख्यमंत्र्यांना जी काही नाटकं करायची आहेत ती त्यांनी पुढच्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत करावी कारण त्यानंतर ते मुख्यमंत्री नसतील असं भाकित भारिप नेते डाॅ. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं. तसंच आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला गरज असेल तर त्यांनी आमच्याशी युती करावी अन्यथा वंचित बहुजन आघाडी स्वतंत्रपणे लढणार असल्याचं सांगत त्यांनी काँग्रेसला अल्टिमेटम दिला.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपविरोधात आघाडी करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने पुढाकार घेतला असला तरी वंचित बहुजन आघाडीची भूमिका काय असणार याबाबत प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्टपणे आपली मतं मांडली आहेत. काँग्रेसला आवश्यकता असेल तर त्यांनी आमच्या सोबत यावे काँग्रेस पक्षाला आमची ताकद कळलेली आहे. त्यामुळेच काँग्रेसमधील नेते सतत माझ्या संपर्कात आहेत असा दावाही आंबेडकर यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत जाण्याचा कोणताही प्रश्न नाही सध्या वंचित बहुजन आघाडीकडे लोकसभेच्या 37 जागांवर उमेदवार तयार आहेत असं म्हणत त्यांनी काँग्रेसला इशारा दिला.

देशातील महापुरुषांचे कार्य त्यांचे योगदान या सर्व गोष्टींची उंची विद्यमान राज्यकर्त्यांनी पैशामध्ये मोजू नये असा इशाराही त्यांनी भाजप सरकारला दिला.

आरोपी संभाजी भिडे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना क्लीन चिट देणे चुकीचे होते. आॅक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुका आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जी काही नाटकं करायची आहेत ती त्यांनी पुढच्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत करावी कारण यानंतर ते मुख्यमंत्री नसणार आहेत आणि त्यानंतर आम्ही भिडे यांच्यावर कायदेशीर पद्धतीने कारवाई करू असा इशाराही आंबेडकर यांनी दिला
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours