अहमदनगर: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हेलिकॉप्टरचं रविवारी दुपारी इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. नगर मधला कार्यक्रम आटोपून शरद पवार नगरहून पुण्याला निघाले होते. नंतर सीटबेल्ट बाहेरच राहिल्याचं लक्षात आलं. त्यामुळे सात मिनिटांनी पुन्हा हेलिकॉप्टर खाली उतरवावं लागलं. शरद पवार आणि त्यांच्यासोबत असलेले इतर सर्व सहकारी सुखरूप असून  ते पुण्यालाही पोहोचले आहेत.

एका कार्यक्रमासाठी कार्यक्रमासाठी शरद पवार नगरमध्ये आले होते. कार्यक्रम झाल्यानंतर साडेसारच्या सुमारास त्यांच्या हेलिकॉप्टरने पुण्यासाठी उड्डाण घेतलं. हेलिकॉप्टर आकाशात गेल्यानंतर सीट बेल्टचा काही भाग हा बाहेर राहिल्याचं पायलटच्या लक्षात आलं.

त्यानंतर तातडीने हेलिकॉप्टर खाली उतरविण्यात आलं. सीटबेल्टमध्ये टाकून हेलिकॉप्टरने पुन्हा उड्डाण घेतलं आणि  शरद पवार  आणि त्यांचे सहकारी सुखरूप पुण्याला पोहोचले अशी माहिती नगरचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी दिली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours