औरंगाबाद: एमजीएम मेडिकल काॅलेजच्या वसतीगृहात विद्यार्थिनीच्या सापडलेल्या मृतदेह प्रकरणाला नवे वळण लागले आहे. या विद्यार्थीने आत्महत्या केली असं सांगितलं जात होतं मात्र, या तरुणीची हत्या झाल्याचं आता उघड झालं आहे.

आकांक्षा देशमुख असं मृत तरुणीचं नाव आहे.आकांक्षा ही मुळची बीड जिल्ह्यातली होती. ती एमजीएम मेडिकल काॅलेजमध्ये फिजिओथेरपीची विद्यार्थिनी होती. कॉलेजच्या वसतिगृहात ती तिच्या 2 मैत्रिणींसोबत राहत होती. मुलींच्या वसतीगृहातील खोलीत तिचा मृतदेह आढळला. तिचा मृत्यू एक दिवसांपूर्वीच झाला होता. मात्र घटना एक दिवसांनंतर कळाली.

आकांशा देशमुख तिच्या 2 मैत्रिणींसोबत हॉस्टेलवर राहत होती. या 2 मैत्रिणी पॉलिटेक्निकलच्या विद्यार्थिनी असल्याचं सांगण्यात येत आहे. परिक्षा संपल्यामुळे या दोघीजणी गेल्या 2 दिवसांआधीच त्यांच्या घरी गेल्या. त्यामुळे आकांक्षा एकटीच राहत होती. ती एका दिवसांपासून दिसली नसल्यामुळे वॉर्डरने खोलीत जाऊन पाहिले असता आकांक्षा मृतदेह आढळला.

तिचा मृतदेह हाती आल्यानंतर शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. शवविच्छेदनाच्या अहवालात आकांक्षाचा गळा दाबून खून केल्याचं निष्पन्न झालं. या प्रकरणी आता खुनाचा गुन्हा दाखल करून पोलीस तपास करणार आहे.

आकांक्षा खून का आणि कशासाठी करण्यात आला याबद्दल पोलीस अधिक तपास करत आहे.

औरंगाबादमधील एमजीएम मेडिकल काॅलेजमध्ये पहिल्यांदाच अशी घटना घडल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours