(बांधकामासाठी हेतुपुरस्पर विलंब)स्थानिक लाेकप्रतिनीधी कमालीचे उदासीन
जिल्हा प्रतिनीधी शमीम आकबानी
भंडारा---जिल्हा महिला रुग्णालयाकरिता टाेकन निधीची तरतुद करुनही या रुग्णालयाच्या बांधकामासाठी हेतुपुरस्पर विलंब केला जात आहे. रुग्णालयाकरिता आरक्षित करण्यात आलेली नियाेजित जागा बीटीबी कंपनीच्या माध्यमातुन हडपण्याचा डाव असुन,रुग्णालयाच्या बांधकामात स्थानिक लाेकप्रतिनिधी आमदार व खासदार हे कमालीचे उदासीन दिसत असल्याचे आराेप शिवसेना जिल्हा प्रमुख व माजी आमदार नरेन्द्र भाेंडेकर यांनी केला आहे.
-----भंडारा येथे स्वतंत्र महिला जिल्हा  रुग्णालय व्हावे अशी मागणी तत्कालिण आमदार नरेंद्र भाेंडेकर यांनी शासनाकडे लावुन धरली हाेती.त्याअन्वये २०१२ वर्षी स्वतंत्र महिला जिल्हा रुग्णालय मंजुर करण्यात आले.त्या रुग्णालयाकरिता ४३ काेटी रुपयाच्या निधी शासनाने मंजुर केला आहे.माजी आमदार नरेन्द्र भाेंडेकर त्यांनी सतत पाठपुरावा केल्याने शासनाने २५ लाख रु.टाेकन निधी उपलब्ध करुन दिला त्यानंतर पुन्हा शासनाकडुन चार काेटी पंचविस चा निधी उपलब्ध करुन देण्यात आला एकुनच सुमारे साडे चार काेटी इतका निधी देवुन ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडुन आवश्यक ती प्रक्रिया तातडीने पुर्न करऩ्यास चालढकल केली जात आहे.जिल्हा महिला रुग्णालयाच्या बांधकामाचे अंदाजपत्रक तयार केल्या नंतर सा.बां.वि.च्या वतीने काही महिन्यापुर्वी निवीदा प्रकाशित करण्यात आली.परंतु त्यानंतर पुढे निविदा स्विकृत करने वर्क ऑर्डर देने अशी काेनतिच प्रक्रिया झाली नाही.महिला रुग्णालयाकरिता नरेन्द्र भाेंडेकर यांच्या नेतृत्वात वारंवार आंदाेलन केल्यानंतर या वर्षी २५ मार्च पर्यंन्त प्रत्यक्ष कामाला सुरुवात करुन असे आश्वासन सा.बां.वि.चे तत्कालिन कार्यकारी अभियंता रुषिकेश राऊत यांनी दिले हाेते. परंतु पुढे ७ महिन्याचा कालावधी लाेटुनही महिला रुग्णालयाच्या बांधकामाचे तिढा सुटला नाही.या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाकडुन अनेक प्रकारच्या तांत्रिक अडचणी पुढे केल्या जात असल्या तरि ,मुळात रुग्णालयाचे बांधकाम हाेऊ नये असा प्रयत्न स्थानिक विद्यमान आमदाराकडुन हाेत आहे.महिला रुग्णालयासाठी आरक्षित जागा बीटीबी कंपनीच्या माध्यमातुन हडपण्याचा डाव असुन खासदार व आमदाराला हजाेराे महिलांचे आराेग्य आणी त्यांच्या जिवीताशी काहीही देणेघेणे नाही.भंडारा येथील जिल्हा महिला रुग्णालयाचे बांधकाम तातडीणे सुरु व्हावे ,आपण सतत पर्यत्नशिल असुन जिल्हा रुग्णालयाचे बांधकाम तातडीणे सुरु करण्यात यावे अशी मागणी नरेन्द्र भाेंडेकर यांनी केली आहे.
देखे विडियो- 

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours