यवतमाळ : निसर्ग व मानवी आरोग्यासाठी जीवघेणे ठरत असलेल्या रासायनिक शेतीपासून शेतक-यांना परावृत्त करण्यासाठी सामुहिक लढा देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पॅन इंडीयाचे संचालक डॉ.नरसिम्हा रेड्डी यांनी केले. शेतकरी न्यायहक्क आंदोलन समिती, यवतमाळ व पॅन इंडीया यांच्या संयुक्त विद्यमाने पल्लवी लॉन यवतमाळ येथे आयोजीत रासायनीक शेतीचे मानवी बळी या विषयावर मंथन परिषद घेण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अ‍ॅड विजया धोटे होत्या. यावेळी शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार, पॅन इंडीयाचे संचालक जयकुमार (केरळ), अ‍ॅड मनी प्रकाश, अ‍ॅड प्रफुल्ल मानकर, वसंत राठोड यांनी परिषदेला मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर किरण कुमरे, यशवंत इंगोले, शालिकबाबु चवरडोल, संजय निकडे, किसनराव पवार, विठ्ठल आडे यांची उपस्थिती होती.
आजवर बहुराष्ट्रीय कंपन्यांनी अधिक उत्पनाचे स्वप्न दाखवून शेतक-यांना रासायनिक उत्पादने वापरण्यासाठी बाध्य केले. मात्र आता त्याचे दुष्परिणाम प्रकर्षाने दिसून येत आहेत. आपण आज शेतात विषाचीच पेरणी करत आहोत असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही असे नरसिम्हा रेड्डी यावेळी म्हणाले. रासायनिक शेतीमुळे आपली आयुमर्यादा कमी झाली असून कर्वâरोग, किडणीचे आजार यासाह विवीध आजारांना जनता बळी पडत आहे. कमी होत चाललेली प्रजनन क्षमता व प्री मॅच्युअर डिलीव्हरी हे देखिल रासायनिक उत्पन्नाचाच परिणाम आहे. 
गतवर्षी जे शेतकरी व शेतमजुर किटकनाशक फवारणीमुळे बाधीत झाले त्यांना सोबत घेऊन एका संस्थेची स्थापना करून त्या माध्यमातून जनजागृती तसेच विषबाधीतांना भरघोस मदत मिळावी यासाठी राज्य व देशपातळीवरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही हा मुद्दा उचलण्यात येईल अशी माहिती डॉ.रेड्डी यांनी यावेळी दिली.
दरम्यान कार्यक्रमानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार यांनी या कार्यक्रमाची भुमिका विषद केली. तसेच किटकनाशक विषबाधा झालेल्या शेतक-यांना व त्यांच्या कुटूंबियांना मदत व्हावी यासाठी महाराष्ट्र किटकनाशक विषबाधीत व्यक्तींची संघटना या संस्थेची स्थापना करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.




Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours