बीड: बीड जिल्हा परिषदेतील भाजपच्या सत्तेतून शिवसंग्राम बाहेर पडणार असल्याचा निर्णय रविवारी झालेल्या राज्य कार्यकारणीच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे, प्रदेशअध्यक्ष तानाजी शिंदे, आमदार भारती लव्हेकर, महिला प्रदेशाअध्यक्ष दिपाली भोसले सय्यद यांची उपस्थिती होती.
शिवसंग्रामचा हा निर्णय भाजपसाठी मोठा धक्का मानला जातोय. निवडणुकीत स्पष्ट बहुमत नसताना बेरजेच्या राजकरणात पंकजा मुंडे यांनी बाजी मारत जिल्हा परिषदेवर झेंडा फडकवला होता. यात शिवसेना, शिवसंग्राम, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सुरेश धस गटाच्या पाच सदस्यानी मदत केली होती. यामुळे बहुमताचा आकडा पार करत हे शक्य झाल होतं.
बीड जिल्हा परिषदेत शिवसंग्रामचे 4 सदस्य आहे. यामुळे उपाध्यक्ष पद शिवसंग्रामकडे आहे. तिच शिवसंग्राम पाठिंबा काढून घेणार असेल तर याचा परिणाम सत्ता टिकवण्यावर होणार आहे. तसंच याचा फटका म्हणजे पंकजा मुंडेंना येणाऱ्या निवडणुकीत अडचणीचा सामना करावा लागणार आहे.
आजच्या बैठकीत शिवसंग्रामचे विनायक मेटे यांनी पंकजा मुंडेंवर स्पष्ट नाराजी व्यक्त करत, आम्ही सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती दिली. यामुळे आता जिल्हा परिषदेची सत्ता राहणार की नाही असा प्रश्न उपस्थिती केला जात आहे. त्यामूळे सध्या तरी पंकजा मुंडेंच्या ताब्यातील जिल्हा परिषदेच्या सत्तेवर ग्रहण समजलं जातं आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours