ठाणे : मी अडीच वर्ष जेलमध्ये काढले पण मलाच माहित नाही की मी जेलमध्ये का होतो, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले आहेत. "महाराष्ट्र सदन बहुत सुंदर, लेकिन जिसने बनाया वो अंदर" अशी खंतदेखील छगन भुजबळ यांनी व्यक्त करून दाखवली.
ठाण्यात आयोजित माळी समाजाच्या मेळाव्यात ते बोलत होते. महाराष्ट्र सदनमध्ये घोटाळा केल्याचा आरोप माझ्यावर केला गेला. पण मी अतिशय भव्य आणि आलीशान महाराष्ट्र सदन बनवलं. या सदनात संपुर्ण महाराष्ट्राचा इतिहास आहे. नरेंद्र मोदींपासून ते राहुल गांधीपर्यंत सगळी मंडळी या सदनात सभा घेतात. अमित शहा तर त्या सदनात राहतात. पण कोणीही या सदनाकरता पैसे दिले नाहीत अशी टीकाही छनग भुजबळ यांनी केली आहे.
तर दाभोळकर पानसरे प्रकरणातील आरोपींना शिक्षा व्हावी की नाही याबाबत हे सरकार गंभीर नसल्याचंही भुजबळ म्हणाले. एक तर आरोपी सापडत नव्हते आणि आता सापडलेत तर आरोपी पत्र दाखल केलं गेलं नाही अशी टीका करत त्यांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत.
आम्ही पण गृह खातं सांभाळलं आहे. एखाद्यावर कारवाई करणं हा पोलीसांचा प्रश्न नाही पण या लोकांना शिक्षा व्हावी ही शासनाची इच्छा आहे की नाही हे आता स्पष्ट झालंय. हे सरकारचं अपयश आहे. जेलमध्ये कोणाला ठेवायचे कोणाला नाही हे सरकार ठरवतं. सीबीआयचे मोठे मोठे अधिकारी एकमेकांवर आरोप करत आहेत, धाडी टाकतायेत. त्यामुळे सरकारचा सावळा गोंधळ असल्याचं भुजबळ म्हणाले.
Post A Comment:
0 comments so far,add yours