भोपाळ, 17 डिसेंबर : राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील नव्या मुख्यमंत्र्यांचा आज शपथविधी होणार आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी काँग्रेसकडून देशातील अनेक दिग्गज नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी कृषीमंत्री शरद पवार हेदेखील या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
राजस्थानमध्ये अशोक गहलोत घेणार शपथ
काँग्रेसचे नेते अशोक गहलोत हे राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. गहलोत यांचा शपथविधी सकाळी 10 वाजता होईल. राजस्थान विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्रिपदासाठी मोठी स्पर्धा पाहायला मिळाली होती. अनुभवी अशोक गहलोत यांना संधी मिळणार की युवा सचिन पायलट बाजी मारणार, याची उत्सुकता होती. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अखेर गहलोत यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं.
कमलनाथ यांचा शपथविधी दुपारी 1 वाजता
मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. केंद्रीय मंत्रिपदाचा मोठा अनुभव असलेले कमलनाथ आता मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळतील. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसने 15 वर्षांनंतर भाजपला पराभूत केलं आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours