अहमदनगर, 28 डिसेंबर : अहमदनगरमध्ये आज महापौर आणि उपमहापौरपदासाठी निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन नगरमध्ये दाखल झाले आहेत. संख्याबळ नसतानाही भाजपकडून सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरू आहेत.

अहमदनगर महानगरपालिका महापौर निवडणुकीसाठी भाजपनं कर्नाटक पॅटर्न हाती घेतला आहे. सर्वात कमी जागा असूनही भाजपनं महापौरपदाच्या निवडणुकीत उडी घेतली आहे. "आपलाच महापौर होणार", असा दावाच भाजपनं केला आहे.

10 डिसेंबर रोजी अहमदनगर महापालिका निवडणुकांची मतमोजणी झाली. 68 जागांपैकी शिवसेना-24, राष्ट्रवादी-18, भाजप-14 अशा जागांवर आहे. परंतु, 35 जागांचा बहुमताचा आकडा कोणत्याही पक्षाला गाठता आला नाही. आज महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपनंही उडी घेतल्यामुळे चुरस वाढली आहे.

भाजपकडून महापौरपदासाठी बाबासाहेब वाकळे यांनी अर्ज भरला आहे. तर शिवसेनेचे बाळासाहेब बोराटे आणि राष्ट्रवादीचे संपत बरस्कार यांनी अर्ज भरला आहे.

कमी जागा असूनही भाजपनं महापौरपदावर दावा केला आहे. आकड्याचं गणित जुळल्यामुळे भाजपनं महापौरपदाचा अर्ज भरला, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours