डोंबिवली, 30 डिसेंबर : महिलेची छेड काढली म्हणून लिंग कापण्यात आलेल्या तरूणाचा मृत्यू झाला आहे. जे जे रुग्णालयात उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला.
महिलेची छेड काढणाऱ्या तरुणाचं लिंग कापल्याची धक्कादायक घटना 26 डिसेंबरला घडली होती. याप्रकरणी पोलिसांकडून तिघांना अटकही करण्यात आली. लिंग कापण्यात आलेल्या तरुणाची प्रकृती चिंताजनक होती. आता अखेर 3 दिवसांनंतर या तरुणाचा मृत्यू झाला आहे.
नेमकं काय घडलं होतं?
आपली सतत छेड काढतो, त्रास देतो आणि मनात लज्जा होईल असं वर्तन करतो म्हणून एका महिलेने आपल्या दोन मित्रांच्या साथीने एका 30 वर्षीय तरुणाचं लिंग कापल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीमध्ये घडली. मंगळवारी ही धक्कादायक घटना घडली होती.
डोंबिवलीतील नांदिवली भागात राहणाऱ्या एका महिलेने आपली छेड काढणाऱ्या तरुणाला धडा शिकवण्याकरता रेल्वेरुळाशेजारील निर्जन स्थळी हा सगळा प्रकार केला. या संपूर्ण प्रकारामुळे डोंबिवलीत एकच खळबळ उडाली होती.
या महिलेने 30 वर्षीय युवकाला स्थानकाशेजारील एकांकी ठिकाणी बोलावलं. तिथे आधीच दबा धरून बसलेले तिचे दोन मित्र प्रतिक केनीया आणि तेजस म्हात्रे यांनी तो तरुण येताच त्याला पकडून झाडाला बांधलं. त्यानंतर त्याला बेदम मारहाण केली.एवढंच नाही तर त्या तरुणाचे लिंग कापले आणि तिथून पसार झाले.
या घटनेची माहिती स्थानिकांकडून मानपाडा पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्या तरुणाला जख्मी अवस्थेत डोंबिवलीच्या एम्स रुग्णालयामध्ये दाखल केलं होतं.
Post A Comment:
0 comments so far,add yours