“ न्याय आपल्या दारी ”  उपक्रमाचा कवडसी येथे जिल्हा शुभारंभ 

 विविध विभागाचे माहिती स्टॉल

उपक्रमाचा लाभ गोरगरीब व वंचितांनी घ्यावा      
     
  भंडारा, दि.9 – न्याय हक्कापासून वंचित राहिलेल्या समाजाच्या विविध घटकांना मुख्य प्रवाहात आणून अशा व्यक्तींपर्यत स्वत: पोहचून न्याय हक्काबद्दल मार्गदर्शन करणे व न्याय मिळवून देण्यासाठी हायकोर्ट बार असोशिएशनच्या माध्यमातून न्यायदूत उपक्रमाचे अयोजन करण्यात आले. यामुळे ग्रामीण लोकांना त्यांच्या समस्या जागीच सोडविण्यास मदत होणार आहे.  विनामुन्य सल्ला तसेच समस्यांची सोडवणूकीसाठी न्यायदूत उपक्रम हक्काचे व्यासपिठ असल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमुर्ती व्ही. एम. देशपांडेयांनी  केले.  
 सामाजिक, आर्थिक, शैक्षणिकदृष्टया वंचित असलेल्या व्यक्तींसाठी कवडसी येथे ‘न्याय आपल्या दारी’ हा न्यायदूत उपक्रम आयोजित करण्यात आला.  या उपक्रमाचा शुभारंभ  मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमुर्ती व्ही. एम. देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. या वेळी  प्रधान जिल्हा व सत्र न्यायधिश संजय देशमुख प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित  होते. तर अप्पर जिल्हाधिकारी दिलीप तलमले, जिल्हा परिषदेचे सभापती प्रेमदास वनवे, विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एम.ए. कोठारी, ॲड. अनिल किलोर, ॲड. कैलास भूरे, ॲड. विजय मोरांडे, ॲड. अतुल पांडे, ॲड. जयंत बिसेन व ॲड. प्रफ्फूल खुबाळकर, तहसिलदार अक्षय पोयाम, कवडसीच्या सरपंच सुनिता बारई  उपस्थित होते. 
 या उपक्रमांत गाव पातळीवरील शासकीय यंत्रणेचे अधिकारी सोबत असून जागेवर सुटणाऱ्या समस्यांचा त्वरित निपटारा करण्यात येतो. ज्या समस्या जटील व क्लिष्ट असतात यासाठी हायकोर्ट बार असोशिएशन पिटिशनर म्हणून जनहित याचिका दाखल करुन त्या सोडविते. अशा प्रकारचा न्याय देण्याचा हा अभिनव उपक्रम आहे. उपक्रमाचा लाभ गोरगरीब व वंचित नागरिकांनी घ्यावा, असे न्यायमुर्ती देशपांडे म्हणाले.  
 या कार्यक्रमानंतर 5 वकीलांची चमु नागरिकांच्या समस्या व प्रश्न जाणून घेवून मार्गदर्शन करण्यासाठी गणेशपूर, कोरंबी, पिंडकेपार, बेला, दवडीपार, सालेबर्डी, पेवठा, लोहारा, चिचोली व पिपरी येथे रवाना झाली.  
सामाजिक, आर्थिक, शैक्षणिकदृष्टया वंचित असलेल्या व्यक्तींसाठी न्यायदूत उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात हायकोर्ट बार असोशिएशनच्या माध्यमातून विविध समस्यांचे व प्रश्नांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या कार्यक्रमात महसूल विभाग, आरोग्य विभाग, धर्मादाय आयुक्त, पशुसंवर्धन विभाग व तसेच शासनाच्या विविध विभागाचे स्टॉल लावण्यात आले.  या स्टॅालवर नागरिकांना योजनांची माहिती देवून त्यांच्या समस्या सोडविण्यात आल्या. या स्टॉलला न्यायमुर्ती देशपांडे व मान्यवरांनी भेटी देूवन शासकीय योजनांची माहिती समजावून घेतली. तसेच ग्रामपंचायत मध्ये कवडसी ग्रामवासियांच्या विविध समस्या जाणून घेतल्या.   
सामाजिक व आर्थिक, मागास,अपंग, अशिक्षीत, वृध्द निराधार अशा व्यक्तींना न्याय मिळवून देणे. ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजूर, महिला व पूरुषांना हक्काची जाणिव करुन देणे अज्ञानामुळे त्यांचेवर होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी योग्य ती मदत करणे. महिला अत्याचार व बाल मजूरी समस्यावर मार्गदर्शन करुन त्या सोडविणे. शासनाच्या विविध योजनांची जनतेला माहिती उपलब्ध करुन देणे व योजनांचा लाभ पात्र व्यक्तींना मिळवून देणे. आवश्यकता भासल्यास वरील समस्या सोडविण्यासाठी उच्च न्यायालायात जनहित याचिका दाखल करणे हा न्यायदूत उपक्रमाचा उद्देश आहे. या उपक्रमाचा लाभ गोरगरीब व वंचित नागरिकांना होणार आहे.
 या कार्यक्रमास वकील संघटनेचे पदाधिकारी,  विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.





Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours