कोरेगाव भीमा विजय स्तंभावर अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येनं आंबेडकरी अनुयायी एकत्र जमणार आहे. मागील हिंसाचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर यंदा कडेकोट बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी प्रतिबंधात्मक आदेश काढून आरोपींना इथं येण्यास मनाई केली आहे.

राष्ट्रवादी देणार मुख्यमंत्र्यांना उत्तर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, "काँग्रेसला आता शरद पवारांसारखा वकील लाभलाय, त्यांना काँग्रेसची वकिली केल्याशिवाय पर्याय नाही" अशी शरद पवारांवर टीका केली होती. आज राष्ट्रवादी मुख्यमंत्र्यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देणार आहे.

नववर्षात तळीरामांवर कारवाई

नववर्षाचं सर्वत्र जल्लोषात स्वागत झालं आहे. थर्टीफस्ट सेलिब्रेशन दरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. मुंबईसह ठिकठिकाणी तळीरामांवर कारवाई करण्यात आली आहे.

दगडूशेठ हलवाई मंदिरात पुणेकरांची गर्दी

नववर्षाच्या पहिल्या दिवशी पुणेकर  मानाच्या दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात.

शिर्डीत साईभक्तांची मांदियाळी

नविन वर्षाच्या स्वागतासाठी साईबाबांची शिर्डी सज्ज झाली आहे. साईमंदिर सुंदर फुलांनी सजले असून शिर्डीत भाविकांची मांदियाळी वाढली आहे. नवीन वर्षाची सुरूवात साईदर्शनाने करण्यासाठी रात्रीपासून भक्तांनी गर्दी केली आहे.  साई समाधी मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात येत आहे. साई मंदिर परिसरातील गुरूस्थान , द्वारकामाई तसंच चावडीतही आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours