मुंबई : भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी 'कृष्णकुंज'वर जाऊन भेट घेतली आहे. आशिष शेलार याची ही वैयक्तिक भेट असल्याचं सांगितलं जात आहे. 
आज संध्याकाळच्या सुमारास आशिष शेलार हे राज ठाकरेंना भेटण्यासाठी त्यांच्या 'कृष्णकुंज' निवासस्थानावर पोहोचले. तब्बल दोन तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे. राज यांचा मुलगा अमित ठाकरे यांचा विवाहसोहळा पुढील महिन्यात आहे. या लग्नसोहळ्याला भाजपच्या कोणकोणत्या नेत्याला निमंत्रण द्यायचं याबाबत चर्चा झाल्याचं कळतं आहे. 
याआधीही याच वर्षी एप्रिल 2018 मध्ये शेलारांनी कृष्णकुंजवर जाऊन राज यांची भेट घेतली होती. दोन्ही नेत्यांमध्ये दोन तास चर्चा झाली होती.वर्षभरातली ही त्यांची दुसरी भेट होती. 
आशिष शेलार हे पहिल्यांदाच 'कृष्णकुंज'वर गेले नाही. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी जेव्हा पंतप्रधान मोदींना पाठिंबा जाहीर केला होता. तेव्हाही, आशिष शेलार आणि विनोद तावडे यांनी 'कृष्णकुंज'वर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली होती.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours