मुंबई: "अहमदनगर महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत आम्ही शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता, पण शिवसेनेकडून आम्हाला कुणीही संपर्कच केला नाही", असा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसंच, "महापौर निवडीच्या 3 दिवसआधी सेनेच्या नेत्यांनी पुर्णपणे संपर्क तोडला आणि शेवटपर्यंत त्यांनी पाठिंबा मागितला नाही", असं स्पष्टीकरणही फडणवीसांनी दिलं आहे. नगर पालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेनं सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. परंतु, महापौरपदाच्या निवडणुकीत सेना पराभूत झाली. भाजपने कमी जागा असून आपला महापौर निवडून आणला आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post A Comment:
0 comments so far,add yours