ठाणे: ठाणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. 2 अट्टल गुन्हेगारांसह पोलिसांनी 10 पिस्तूल, 40 जिवंत काडतूसे जप्त केली आहेत. खंडणी घेणे, सुपारी घेणे, हत्यार सप्लाय करण्याची कामं हे आरोपी करत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

राज्यातील पिस्तूल सप्लाय करणारी ही टोळी असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. त्याचबरोबर राज्यातील अनेक मोठ्या व्यक्ती यांच्या टार्गेटवर असल्याचं पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं आहे.

नवीन वर्षाच्या सुरुवातीला मोठा हल्ला करण्याचा आणि घातपात घडवण्याचा या टोळीचा प्रयत्न असल्याचंही पोलिसांनी म्हटलं आहे. दरम्या, ऐन नव्या वर्षात पोलिसांनी केलेली ही मोठी कारवाई मानली जात आहे.

तर इथून मागे झालेल्या हत्या आणि हल्ल्यांशी या टोळीचा काही संबंध आहे का याचाही आता पोलीस तपास करत आहेत. ताब्यात घेतलेल्या 2 जणांची आता ठाणे पोलीस कसून चौकशी करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours