पुणे, 13 जानेवारी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे या राज्याच्या राजकारणात येणार का, याबाबत अनेकदा चर्चा होते. यावर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका असल्याने पुन्हा एकदा या चर्चेने वेग पकडला आहे. पण आता खुद्द सुप्रिया सुळे यांनीच याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का? असा प्रश्न एका कार्यक्रमादरम्यान सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, "मला पहिली महिला मुख्यमंत्री होण्यात फारसं स्वारस्य नाही. मी लोकसभेसाठीच पुन्हा एकदा इच्छुक असून पक्षाकडे लोकसभेचंच तिकीट मागितलं आहे." याबाबत एका मराठी वेबसाईटने वृत्त दिलं आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू आहे. दोन्ही पक्षांमधील जागावाटपाची चर्चाही अंतिम टप्प्यात आहे.
कसा असेल आघाडीचा फॉर्म्युला?
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांनी 50-50 च्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब केलं आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours