रत्नागिरी : पोलादपुर -आंबेनळी घाटातील दापोली कोकण कृषी विद्यापीठ बस अपघात प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. या प्रकरणी मृत बसचालक प्रशांत भांबेड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत यांच्यावर गुन्हा दाखल केल्यामुळे नातेवाईकांनी आक्षेप घेत उपोषणाचा इशारा दिला आहे.
28 जुलै 2018 ला पोलादपूर-महाबळेश्वर राज्य मार्गावर कोकण कृषी विद्यापीठाच्या ज्या बसला अपघात झाला होता. या अपघातात 30 कर्मचारी जागीच ठार झाले होते. याप्रकरणी 5 महिन्यानंतर मृत बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी, या मागणीसाठी आज दापोलीत सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती. प्रशांत भांबेड यांच्यावर पोलादपूर पोलिसात दाखल गुन्हा झाल्याने नातेवाईक आणि गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
प्रशांत भांबेड यांच्यावरील गुन्हा मागे घ्यावा, या अपघात प्रकरणातील संशयित आरोपी प्रकाश सावंत देसाई यांची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours