मुंबई: आयसीआयसी बँक आणि व्हिडिओकॉन कर्ज प्रकरणी सीबीआयच्या 4 पथकांनी औरंगाबाद आणि मुंबईत काही ठिकाणी छापे टाकले आहेत. सीबीआयच्या पथकाने व्हिडिओकॉनच्या मुंबई मुख्यालयात देखील छापे टाकले आहेत. 
आयसीआयसी आणि व्हिडिओकॉन कर्ज प्रकरणी सीबीआयच्या पथकाने मोठी कारवाई सुरु केली. सीबीआयने वेणूगोपाल धूत यांच्या व्हिडिओकॉन ग्रुप आणि दीपक कोचर यांच्या नूपॉवर रिन्युएबल विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 
दीपक आयसीआयसी बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांचे पती आहेत. कर्ज वाटपात नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपानंतर चंदा कोचर यांना राजीनामा द्यावा लागला होता. 
बँकेने व्हिडिओकॉनला कर्ज देण्याच्या बदल्यात त्यांनी दीपक कोचर यांना मदत करावी असा आरोप करण्यात आला होता. कोचर आयसीआयसीच्या प्रमुख असताना व्हिडिओकॉनला 3 हजार 205 कोटीचे कर्ज मंजूर करण्यात आले होते. 
- सीबीआय पथकाच्या 4 पथकांची औरंगाबाद आणी मुंबईत तपासणी सुरू
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours