मुंबई: विक्रोळीमधील पार्क साईट परिसरात व्हॅलेंटाईन डे साजराकरून आल्यानंतर एक 16 वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर येत आहे. बॉयफ्रेंडच्या अकाली मृत्यूमुळे तरुणीने व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आत्महत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.
रुपम यादव असं आत्महत्या करण्याऱ्या तरुणीचं नाव आहे. ती डिग्रीच्या पहिल्या वर्गात शिकत होती. रुपमची एका मुलाशी मैत्री होती. त्याने भांडूपमध्ये त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली. त्यामुळे या प्रकरणात भांडूप पोलिसांनी वारंवार रुपमची चौकशी केली. त्यामुळे ती व्यथित होती.
वारंवार चौकशीमुळे आणि बॉयफ्रेंडला गमावल्याच्या नैराश्यात येत रुपमने आत्महत्या केली असल्याचा आरोपी तिच्या कुटुंबीयांनी लगावला आहे. बॉयफ्रेंडच्या आत्महत्येमुळे रुपम दुखी होती. ती सारखी एकटी राहायची. यावर तिला तिच्या भावंडांनी खूप समजवलं. पण ती त्याला विसरू शकत नव्हती.
त्यात व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी त्याची उणीव तिला जाणवत होती. त्याच नैराश्यातून रुपमने आत्महत्या केली असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours