पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यानंतर युरोपियन युनियननं पाकिस्तानला मोठा धक्का दिला आहे. युरोपियन युनियननं ब्लॅक लिस्टेड केल्यानं पाकिस्तानसमोरच्या अडचणी वाढल्या आहेत. पाकिस्तानसोबत सौदी अरब, पनामा आणिम अमेरिकेतील 4 राज्यांचा देखील यामध्ये समावेश आहे.

दरम्यान, युरोपीयन युनियनच्या या निर्णायाचा काही देशांनी निषेध केला आहे. मनी लाँड्रिंग आणि दहशतवादी कारवायांना होणारा आर्थिक पुरवठा थांबवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, पनामानं आपण मनी लाँड्रिंगबाबत कठोर पावलं उचलल्याचं म्हटलं आहे. पण, या निर्णयामुळे पाकिस्तानसमोरच्या अडचणी वाढल्या आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours