कोल्हापूर, 25 फेब्रुवारी : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक विश्वास नांगरे पाटील यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी आता एटीएसचे पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
कुणाची कुठे बदली झाली?
नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्ह्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नाशिक हे शहर गुन्हेगारांचा अड्डा बनलाय की काय, असा सवालही उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनावर मोठी टीका केली जात होती.
अशातच आता कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांची नाशिक पोलीस आयुक्तपदी बदली झाली आहे. दुसरीकडे, नाशिक पोलीस आय़ुक्त रवींद्र सिंघल यांची औरंगाबाद परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.
तेजस्वी सातपुते (पोलीस उपायुक्त, पुणे शहर ते पोलीस अधीक्षक, सातारा), दत्ता शिंदे (पोलीस अधीक्षक, जळगांव ते (पोलीस अधीक्षक, सुरक्षा, महावितरण, मुंबई), इशू सिंधू (निवासी उपायुक्त, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली ते पोलीस पोलीस अधीक्षक, अहमदनगर) आणि रंजनकुमार शर्मा (पोलीस अधीक्षक, अहमदनगर ते पोलीस अधीक्षक, CID, नागपूर),पी. व्ही. उगले (SP, ACB, नाशिक ते पोलीस अधीक्षक जळगांव), विनिता साहू (पोलीस अधीक्षक, भंडारा ते पोलीस अधीक्षक, गोंदिया), हरिष बैजल (पोलीस अधीक्षक, गोंदिया ते समदेशक, SRPF, गट क्रमांक ६, धुळे), अरविंद साळवे (पोलीस अधीक्षक, सुरक्षा, महावितरण, मुंबई ते पोलीस अधीक्षक, भंडारा), जयंत मीना (अप्पर पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण ते अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती, पुणे ग्रामीण), पंकज देशमुख (पोलीस अधीक्षक, सातारा ते, पोलीस उपायुक्त, पुणे शहर)
Post A Comment:
0 comments so far,add yours