पुणे, 05 फेब्रुवारी : शाहरुख खानचा 'डर' हा सिनेमा तुम्हा सगळ्यांनाच आठवत असेलच. या सिनेमात शाहरुख प्रेयसीला घाबरवत असतो. असाच एक धक्कादायक प्रकार पुण्यात चतुर्शृंगी भागात घडला आहे. प्रेम प्रकरणातून तरुणाने हवेत गोळ्या झाडल्याचा प्रकार समोर आला आहे. तरुणीच्या हॉस्टेल बाहेर हा प्रकार घडला आहे.
ब्रेकअप झाल्यामुळे प्रियकर चिडला होता. त्यावर प्रेयसीला घाबरवण्यासाठी त्याने तिच्या हॉस्टेलबाहेर जाऊन गोळीबार केला. गेल्या काही दिवसांआधीच त्यांचा ब्रेकअप झाला होता. त्यामुळे प्रियकर प्रचंड चिडला होता.
तरुणाने फक्त हवेत गोळीबारच नाही तर त्यानंतर त्याने तिसऱ्या मजल्यावरून उडी टाकल्याची माहितीही समोर येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच चतुर्शृंगी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तरुणाला ताब्यात घेतलं आहे.
दरम्यान, पोलीस सध्या या संपूर्ण प्रकाराचा कसून तपास करत आहेत. या तरुणाकडे बंदूक आलीच कशी याचाही आता पोलीस तपास करत आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीने तख्त गाठला आहे. त्यामुळे पुणेकरांना आता पोलिसांचा धाक उरला नाही का ? असा सवाल उपस्थित होतो.
Post A Comment:
0 comments so far,add yours