मुंबई, 05 फेब्रुवारी: लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यास आता काही दिवसांचाच अवधी उरलांय.  मात्र अजूनही युती संदर्भात अधिकृत घोषणा झालेली नाही. इकडे शिवसेनेने मतदारसंघ निहाय जोरदार तयारी सुरू केली आहे. शिवसनेचे विद्यमान खासदार असलेला आणि नसलेलाही मतदारसंघांचा आढावा गेले काही दिवस मातोश्रीवर घेतला जातोय.
आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना नेते आणि खासदार यांची महत्वाची बैठक मातोश्रीवर होणार आहे. या बैठकीत लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार असलेल्या उमेदवारांवर शेजारील मतदारसंघाचीही जबाबदारी देण्यासंदर्भात चर्चा होणार आहे. त्याच बरोबर शिवसेना पदाधिकाऱ्यांना त्यांच्यी जबाबदारीही देण्यात येणार आहे. या बैठकी नंतर शिवसेना महाराष्ट्रातील ४८ पैकी किती लोकसभा मतदार संघात सक्रिय ताकत लावणार हे निच्छित होईल. त्यामुळे शिवसेना युती करणार की नाही करणार. तसेच किती जागांसाठी शिवसेनेची जय्यत तयारी सुरू आहे. याची उत्तरे मिळू शकतील.
25-23चा फॉर्म्युला फायनल होणार?
लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना यांच्या युतीसंदर्भातील चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. युती संदर्भात दोन्ही पक्षांकडून अद्याप अधिकृतपणे काहीच सांगण्यात आले नसले तरी चर्चा सुरु असल्याचे समजते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आगामी लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांमध्ये 25-23चे सूत्र निश्चित होण्याची शक्यता आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours