नागपूर, 26 मार्च: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी नागपूरमधून लोकसभेसाठी अर्ज दाखल केला. यावेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीची माहिती दिली आहे. गेल्या 5 वर्षात गडकरी यांच्या संपत्तीत 140 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गडकरींनी सादर केलेल्या माहितीनुसार 2017-18 मध्ये त्यांची उत्पन्न 6.4 लाख इतके होते. तर 5 वर्षापूर्वी 2013-14मध्ये त्यांचे वार्षिक उत्पन्न 2.7 लाख इतके होते. 2014-15 या आर्थिक वर्षात त्यांच्या उत्पन्नात 6 लाखांनी वाढ झाली. त्यानंतर त्यांचे उत्पन्न मात्र स्थिर आहे. 
गडकरी यांच्या पत्नी कांचन यांच्या उत्पन्नात 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2013-14 या आर्थिक वर्षात त्यांचे उत्पन्न 4.6 लाख होते. त्यात 2017-18मध्ये वाढ होत ते 40 लाखावर पोहोचले आहे. यंदा प्रथमच उमेदवारांना गेल्या पाच वर्षातील आय टी रिटर्न्समधील उत्पन्नाची माहिती द्यावी लागणार आहे. 
एकूण संपत्ती 7 कोटी

गडकरींची एकूण संपत्ती 6.9 कोटी रुपये अतकी आहे. यातील 1.96 कोटी संपत्ती वडीलांकडून मिळालेली आहे. 2014च्या तुलनेत या संपत्तीत 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. वडीलांकडून मिळालेल्या संपत्तीचे मुल्य वाढल्याने ही वाढ झाली आहे. 
पत्नीची संपत्ती 127 टक्क्यांनी वाढली
गडकरी यांच्या पत्नी कांचन यांच्याकडे 7.3 कोटी इतकी संपत्ती आहे. 2014च्या तुलनेत त्यांच्या संपत्तीत 127 टक्के वाढ झाली आहे. गडकरी यांच्याकडे वरळी येथे एक फ्लॅट आहे. या घराची किमत 2014मध्ये 3.78 कोटी इतकी होती ती आता 12.5 टक्क्यांनी वाढून 4.25 कोटी झाली आहे. त्याशिवाय त्यांच्याकडे 22 लाखांचे दागिने आहेत. 
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours