मुंबई, 26 मार्च : मुख्यमंत्र्यानी शिवसेनेचे रविंद्र गायकवाड यांची समजूत काढली असल्याची माहिती देण्यात आली आहे. रविंद्र गायकवाड यांनी उस्मानाबादमधून उमेदवारी हवी होती पण ती ओमराजे निंबाळकर यांना देण्यात आल्याने ते नाराज होते. सोमवारी दुपारी 'मातोश्री'वर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी समजूत काढल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारी मध्यरात्री रविंद्र गायकवाड पोचले. बैठकीला शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, उमरग्याचे आमदार ज्ञानेश्वर चौघुले, शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. तर पालघरमध्ये शिवसेनेकडून राजेंद्र गावित यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची चर्चा आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post A Comment:
0 comments so far,add yours