नवी दिल्ली, 28 मार्च: लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. निवडणुकीसाठीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या आधी सभा आणि रॅलीला जोर चढत आहेत. सत्ताधारी भाजपचे सर्वात लोकप्रिय प्रचारक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014मध्ये विक्रमी सभा घेतल्या होत्या. याशिवाय त्यांनी चाय पे चर्चा आणि थ्री डी सभा देखील घेतल्या होत्या. यंदा देखील मोदी हेच भाजपचे मुख्य स्टार प्रचारक असतील. 
लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान होणार आहे. यासाठी PM मोदी महाराष्ट्रात येणार आहेत. राज्यात लोकसभेच्या 48 जागा आहेत. चार टप्प्यांपैकी प्रत्येक टप्प्यात दोन अशा रितीने मोदी राज्यात एकूण 8 सभा घेणार असल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले. मोदींच्या या आठ सभेच्या दृष्टीने भाजपने नियोजन केले आहे. मात्र या सभा कुठे घ्यायच्या आणि सभांची संख्या वाढवायची काय याबाबतचा अंतिम निर्णय PM मोदीच घेणार आहेत. 
मोदींची पहिली सभा 1 एप्रिल रोजी वर्धा येथे होणार आहे. दरम्यान, त्यांची शेवटची सभा मुंबईत घेण्याच्या हलचाली पक्षाकडून सुरु आहेत. अर्थात राज्यात मोदी कधी, कुठे आणि केव्हा सभा घेणार याचे नियोजन अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. 

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours