नागपूर, 15 मार्च : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून राज्यासहीत देशातलं राजकीय वातावरण अधिक तापू लागले आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका-टिप्पणी करण्यात व्यस्त आहेत. याच पार्श्वभूमीवर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.  नवीन पिढीला संधी देण्याच्या निर्णयामुळे माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार नसल्याचे शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केले. यावरूनच नितीन गडकरी यांनी निशाणा साधत म्हटलं की, 'शरद पवार यांना माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवल्यानंतर ती जिंकू असा विश्वास नसेल किंवा सध्या राज्यसभेची मुदत असल्यामुळे त्यांनी माघार घेतली असावी'.
'विदर्भात 10 जागा जिंकू'
दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत विदर्भातील सर्व दहाच्या दहा जागा जिंकू असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला आहे. तसंच, मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा राज्यात आणखी दोन ते तीन जिंकून आणू, असेही त्यांनी म्हटलं.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours