मुंबई : भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाल्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात राज ठाकरेंनी हवाई दलानं केलेल्या एअर स्ट्राइकचं समर्थन केलं आहे, पण त्याचवेळी सरकारलाही आवाहन केलं आहे.
'युद्ध हे कोणत्याही प्रश्नाचं उत्तर असू शकत नाही. युद्ध दोन्ही देशांना मागे घेऊन जाईन. अतिरेक्यांना ठेचलंच पाहिजे. पण म्हणून कोण युद्धजन्य परिस्थिती तयार करून राजकीय फायदा घेऊ नये. पाकिस्तानने त्यांच्या कैदेत असणाऱ्या आमच्या वैमानिकांना, अभिनंदन यांना तात्काळ सोडलं पाहिजे आणि सीमेवरचा गोळीबारही थांबवला पाहिजे. असं घडलं तर नरेंद्र मोदी यांनीदेखील चर्चेची ही संधी गमावता कामा नये,' असं म्हणत राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन केलं आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours