मुंबई, 1 मार्च : भारत पाकिस्तान सीमेवर तणावाचे वातावरण असताना देशात हाय अलर्ट देण्यात आला आहे. जैश ए मोहम्मदचे पाकिस्तानातील तळ हवाई हल्ला करून उद्ध्वस्त केल्यानंतर भारतात दहशतवादी हल्ल्याची शक्यता असल्याने गुप्तचर संस्थांनी सतर्कतेचे आदेश दिले आहेत. य़ाच पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेच्या मुख्य सुरक्षा आधिकाऱ्यांनी दहशतवादी हल्ल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, इतिहासातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे.
पश्चिम रेल्वेने लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की, रेल्वे प्रशासनाला पोलिसांकडून मिळालेल्या फॅक्सनुसार पुलवामा हल्ल्यानंतर दहशतावादी हल्ला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेल्वेस्टेशन, मंदिरे या ठिकाणी बॉम्ब हल्ला केला जाऊ शकतो. दहशतवादी इतिहासातील सर्वात मोठा बॉम्ब हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची भीती या पत्रात व्यक्त करण्यात आली आहे.
रेल्वेच्या पत्रात म्हटलं आहे की यात हैदराबादची व्यक्ती असून त्याचे नाव मोहम्मद इब्राहिम असे आहे. त्याच्यासोबत रेहान नावाचा आत्मघाती हल्लेखोर असून एक वयस्क महिलेचाही समावेळ आहे. या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर रेल्वेस्थानक असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आलं आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours