लोकसभा नागपूर I लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये महाराष्ट्रातून 5 नावं जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये नागपूरमधून नाना पटोले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नागपूर हा भाजपचे नेते आणि केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे नितीन गडकरी विरुद्ध नाना पटोले अशी मोठी लढत पाहण्यास मिळणार आहे. तसंच मुंबई दक्षिणमधून मिलिंद देवरा, उत्तर मध्य मुंबईतून प्रिया दत्त, सोलापूरमधून सुशील कुमार शिंदे आणि गडचिरोलीतून डॉ.नामदेव उसेंडी यांनाही उमेदवारी करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, नाना पटोले यांनी भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. नाना पटोले हे भंडारा मतदारसंघातून निवडून आले होते. परंतु, नाना पटोले हे जास्त दिवस भाजपमध्ये रमले नाही. अखेर त्यांनी भाजपला 'जय श्रीराम' करत काँग्रेसमध्ये घरवापसी केली होती.


Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours