मुंबई, 14 मार्च : आघाडीतील जागा वाटपावर चर्चा करण्यासाठी काँग्रेसच्या कार्यकारिणीची आज मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये काँग्रेसचे महत्त्वाचे नेते सहभागी होणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे – पाटील यांच्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. सुजय विखे – पाटील यांनी भाजपला हात दिला.त्यामुळा राधाकृष्ण विखे - पाटील काय निर्णय घेणार हे पाहावं लागणार आहे. गांधी भवनात होणाऱ्या बैठकीत राधाकृष्ण विखे – पाटील राजीनामा  देणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
तसेच, आघाडीमध्ये मित्र पक्षांना सामील करून घेण्याबाबत देखील चर्चा होणार आहे. एनडीएचे मित्र पक्ष असलेला स्वाभिमान शेतकरी संघटना नाराज असून राजू शेट्टी यांनी आता काँग्रेस – राष्ट्रवादीकडे हात पुढे केला आहे. त्यामुळे राज्यातील समीकरणं निवडणुकीच्या तोंडावर बदलताना दिसत आहेत.  आजच्या बैठकीमध्ये घटक पक्षांना जागा देण्याबाबत देखील चर्चा केली जाणार आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours