मुंबई, 14 मार्च : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एनडीएचा मित्रपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आता भाजप – शिवसेनेची साथ सोडून आघाडीशी मैत्री करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना – भाजप युती झाल्यानंतर मित्र पक्षांची दखल न घेतल्यानं मित्र पक्षांमधील नाराजी दिसून आली. दरम्यान, राजू शेट्टी यांनी आता आघाडीशी जवळीक केली असून आज जागा वाटपावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. जागावाटपासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मध्यस्थीनं काँग्रेसचे नेते अहमद पटेल आणि राजू शेट्टी यांची फोनवरून चर्चा झाली. यावेळी काँग्रेस स्वाभिमानी शेतकरी संघटनेला वर्धा किंवा सांगलीची जागा देण्याची शक्यता आहे. सूत्रांनी याबाबतची माहिती दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून हातकणंगले येथे राजू शेट्टी तर काँग्रेसकडून आणखी एक जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post A Comment:
0 comments so far,add yours