पुणे, 14 मार्च : मुंबईत शिवसेना – भाजप आमदारांच्या मनोमिलनासाठी डिनर डिप्लोमसीचं आयोजन केल्यानंतर आता दोन्ही पक्षांनी पुण्यात लक्ष केंद्रीत केलं आहे.  परस्परांवर चौफेर टिका केल्यानंतर देखील दोन्ही पक्षांनी परिस्थितीचा अंदाज घेत अखेर हातमिळवणी केली. पण, कार्यकर्त्यांमध्ये अद्याप तरी कटुता कायम दिसून येत आहे. त्याच पार्श्वभूमिवर आता दोन्ही पक्षांनी खबरदारीची पावलं उचलायला सुरूवात केली आहे. कार्यकर्त्यांच्या दिलजमाईसाठी आता पुण्यात मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.


यापूर्वी देखील डिनर डिप्लोमसीच्या माध्यमातून दोन्ही नेत्यांनी आमदारांना मार्गदर्शन करत सत्ता आपलीच येणार असा विश्वास दिला होता. लोकसभेसाठी भाजप 25 तर शिवसेना 23 जागा लढणार आहे. तर, विधानसभेसाठी दोन्ही पक्षांनी 50 – 50चा फॉर्म्युला निश्चित केला आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours