मुंबई, 16 मार्च : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील हिमालय पूल कोसळल्याने 6 जणांना प्राण गमावावा लागला. या दुर्घटनेत 20 हून अधिक लोक जखमी झाले. या दुर्घटनेची जबाबदारी कोणाची? असा प्रश्न निर्माण झाला होता. या प्रकरणी महानगरपालिकेने मुख्य अभियंता ए.आर.पाटील आणि सहाय्यक एस.एफ. काकुळते यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. 
दरम्यान, हा पूल स्वच्छ भारत अभियानांतर्गत करण्यात आलेल्या सुशोभिकरणामुळे कोसळल्याचा संशय पालिकेतील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. सुशोभीकरणावेळी पुलावर आकर्षक लाद्या बसवण्यात आल्या. यामुळे पुलावरील भार वाढला आणि पूल कोसळला असं अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 
देशातील अनेक पर्यटनस्थळांची स्वच्छ भारत अभियानाची निवड करण्यात आली होती. यात सीएसएमटी परिसराची निवड झाली होती. या अभियानांतर्गत प्रशासनाने हिमालय पुलाचे सुशोभीकरण, पदपथ दुरुस्ती, रंगकाम करण्याचा निर्णय घेतला होता. हिमालय पुल चांगला दिसण्यासाठी त्यावरील लाद्या बदलण्यात आल्या. 14 लाख रुपयांचा खर्च करताना पुलावर वाढणाऱ्या भाराची मात्र कोणतीही काळजी घेतली गेली नाही. याचाच परिणाम म्हणजे पुल कोसळला असल्याचे अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये ही गोष्ट लक्षात यायला हवी होती. पण याकडे दुर्लक्ष झाल्याचे या अधिकाऱ्याने म्हटले आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours