मुख्य सपादिका..सुनिता परदेशी
घाटंजी : शेतक-यांच्या प्रत्येक समस्येच्या वेळी कधी रस्त्यावर तर कधी न्यायालयात लढा देत शेतक-यांना न्याय मिळवून देणारे देवानंद पवार हे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे सच्चे शिलेदार आहेत असे प्रतिपादन किसान कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी केले. महाराष्ट्र किसान कॉंग्रेसच्या विदर्भ विभाग प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शेतकरी नेते देवानंद पवार यांच्या भव्य नागरी सत्काराचे आयोजन घाटंजी तालुका नागरी सत्कार समितीतर्फे करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधान परिषद आमदार हरिभाऊ राठोड होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन माजी आमदार तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष विजयाताई धोटे, रामरतन राऊत,किसान कॉंग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक सुनिल ठोंबरे, माजी जि.प.अध्यक्ष प्रफुल्ल मानकर, सत्कारमुर्ती महाराष्ट्र प्रदेश किसान कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (विदर्भ विभाग) देवानंद पवार, चेतना देवानंद पवार, शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे मिलिंद धुर्वे, अशोक भुतडा यशवंत इंगोले, भाऊराव मरापे, रितेश परचाके, बळवंत नैताम, मोतीराम आत्राम यांची प्रमुख उपस्थिती होती.
उपस्थितांना संबोधीत करतांना नाना पटोले पुढे म्हणाले की, कॉंग्रेसमध्ये जो काम करेल त्याला प्राधान्य मिळणार आहे. देवानंद पवार यांनी गेली काही वर्ष शेतक-यांसाठी लढा देऊन स्वत:ला सिद्ध केले आहे. त्यामुळेच कॉंग्रेस पक्षाने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविली आहे. या पदाच्या माध्यमातून ते शेतकरी हित व कॉंग्रेस पक्षाच्या धोरणांना शेतक-यांपर्यंत पोहचविण्यासाठी कार्य करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विधानपरिषदेचे आमदार हरिभाऊ राठोड यावेळी बोलतांना म्हणाले की येत्या काळात शेतक-यांसाठी लढणारे नेतेच राजकारणात पुढे जातील. त्यामध्ये देशात नानाभाऊ पटोले व राज्यात देवानंद पवार आघाडीवर असेल असे ते म्हणाले.
दरम्यान मान्यवरांच्या हस्ते देवानंद पवार यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. उल्लेखनिय म्हणजे पळसफुलांच्या हाराने उभयतांना गौरविण्यात आले. तसेच यावेळी नानाभाऊ पटोले यांचा अनोख्या पद्धतीने सत्कार करण्यात आला. पळसफुलांच्या हारासह विवीध शेती साहित्य देऊन शेतक-यांसाठीचा लढा आणखी बळकट करावा अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. दरम्यान ख्यातनाम कवी हेमंतकुमार कांबळे लिखीत किसान कॉंग्रेसच्या गिताचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी इतर मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शैलेश इंगोले व संचालन हेमंतकुमार कांबळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रफिक बाबु, शालीकबाबु चवरडोल, संजय डंभारे, सैय्यद छब्बु, गजानन पाथोडे, जयवंत आडे,वासुदेव राठोड, रणजीत जाधव, सुरेश बेले, रामचंद्र भोयर, अमोल बेले, महेश भोयर, प्रल्हाद गेजीक, संदिप जमदापुरे, कर्णु चौधरी, रणजीत जाधव, अशोक पवार, अनिल राठोड,  शंकर काकडे, अमोल मोतेलवार, बाळू राठोड, दिलीप कोवे, धनराज पवार, रवि इंगोले, मधुकर डंभारे, चौधरी काका आमडी, संतोष गोफणे, अर्जुन चव्हाण, रोहीदास जाधव यांनी पुढाकार घेतला.



Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours