मुंबई, 10 एप्रिल : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली आहेत. उद्धव ठाकरेंनी भाजपच्या संकल्पपत्रास शंभरपैकी दोनशे गुण दिले आहेत. '370 कलमाने कश्मीरला दिलेला विशेष अधिकार व त्या विशेष अधिकारातून तेथे निर्माण झालेल्या हिंदुस्थानविरोधी मस्तवालपणाचे समर्थन कुणालाच करता येणार नाही. हिंदुस्थानची अखंडता व सार्वभौमत्व यांच्याशी तडजोड करता येणार नाही. अयोध्येतील भव्य राममंदिर निर्माणासाठी 2019 ही शेवटची संधी आहे. समान नागरी कायदा व 370 कलमाबाबत जे आता तडजोड करतील त्यांना इतिहास माफ करणार नाही. भाजपचे संकल्पपत्र हे राष्ट्रीय भावनेचे संकल्पपत्र आहे. शिवसेनेच्या सर्व मागण्या व भूमिकांचे प्रतिबिंब त्यात पडले आहे', अशा शब्दांत त्यांनी पंतप्रधान मोदींसह भाजपचं कौतुक केलं आहे.
काय आहे आजचे सामना संपादकीय?
- 2022 मध्ये देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानुसार स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणाऱ्या महापुरुषांच्या स्वप्नातील हिंदुस्थान निर्माण करण्यासाठी 75 उद्दिष्टे निश्चित केल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले आहे. शेती, गरिबी, छोटे दुकानदार, शिक्षण या विषयांना भाजपच्या संकल्पपत्रात प्राधान्य दिले आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours