मुंबई, 10 एप्रिल: जेव्हा शरद पवार माझ्या सभेला आले त्यावेळी माझा विजय झाला, अशा शब्दात काँग्रेसचे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मिलिंद देवरा यांनी आगामी निवडणुकीतील विजयाबद्दल आशावाद व्यक्त केला. देवरा यांच्या यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मंगळवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
भायखळा येथील देवरा यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटनावेळी बोलताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला. मोदींनी देशातील जनतेचा भरवसा सोडला. ते विकासाचा रस्ता दाखवतील असे वाटत होते. पण विकासासाठी ते अपयशी ठरले आहेत. एकेकाळी विकास, विकास बोलणाऱ्या मोदींकडे हिंदू-मुस्लिम याशिवाय मुद्देच नाहीत. आता मोदी आणि भाजपकडे विकासाचे सांगण्यासारखे काही नाही. त्यामुळे त्यांना धर्म आठवतोय, अशी टीकाही पवारांनी केली.
Post A Comment:
0 comments so far,add yours